मकर संक्रांती विशेष रात्रभर आकाशदर्शन कार्यक्रम १३ जानेवारी २०१८

मकर संक्रांती निमित्त खगोल मंडळातर्फे रात्रभर आकाश दर्शनाचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम मराठी भाषेत असेल.

कार्यक्रम शनिवार दि. १३ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता सुरु होईल व रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पहाते ४:३० वाजता संपेल. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल:

तारीख: शनिवार दि. १३ जानेवारी २०१८ 

मार्गदर्शनाची भाषा: मराठी

स्थळ: सगुणा बाग, नेरळ

अधिक माहितीसाठी संपर्क ईमेल:  abhay@khagolmandal.org

प्रवेश फक्त केवळ आगाऊ नोंदणी द्वारे. थेट प्रवेश नाही !

 

कार्यक्रमाचे स्वरूप:

१८३० ते १९०० : नाव नोंदणी व माहिती

१९०० ते १९३०: दुर्बिणीची माहिती

१९३० ते २०३० : आकाश दर्शनाचे पहिले सत्र

२०३० ते २२०० : दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन

२२०० ते २३०० : भोजनावकाश

२३०० ते ०१००: मकर संक्रमणाचे गुपित; चर्चा सत्र व प्रश्नोत्तरे

०१०० ते ०१४५ : चहा

०१४५ ते ०२४५ : आकाश दर्शनाचे दुसरे सत्र 

०२४५ ते ०४३० : दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन 

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळा आकाश स्थिती प्रमाणे बदलण्यात येतील

शुल्क:

सर्व-सामान्य तिकीट: रु. ४५०/- प्रती व्यक्ती

विद्यार्थी तिकीट : रु. ४००/- प्रती व्यक्ती ( ८ ते १६ वर्ष वयाच्या विद्यार्थांकरीता)

बाल तिकीट: विनामुल्य ( ८ वर्षा पर्यंतच्या मुला/मुलिं करीता प्रवेश शुल्क नाही)

रात्रीचे भोजन : रु. २२५/- प्रती व्यक्ती

टीप:

  • भोजन तिकीट ऐच्छिक असते. आपण आपला डबा आणू शकता व तसे केल्यास भोजनाचे तिकीट घेऊ नये.
  • नेरळ स्टेशन ते सगुणा बाग बस व रात्रीचा चहा विनामुल्य आहे.
  • पाउस वा तत्सम नैसर्गिक आपत्ती किंवा संयोजकांच्या हाता बाहेरील कोणत्याही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्यास शुल्क परत केले जाणार नाही. इतर अटी लागू.

काय आणावे ?

रात्रीच्या जेवणाचा डबा

बसायला चटई, सतरंजी चादर इ.

थंडी करीता लोकरीचे कपडे, स्वेटर, मफलर, शाल इ.

व्यक्तिगत औषधे, ऑडोमास इ.

रात्री चहासोबत खाण्यासाठी खाद्यपदार्थ

वरील पैकी कोणत्याही वस्तू नेरळ येथे मिळत नसल्याने तयारीनिशी यावे ही विनंती.

कोठे भेटावे ?

आपण थेट सगुणा बाग येथे येऊ शकता.

लोकल ट्रेनने येत असल्यास १६:३० ची कर्जत फास्ट लोकल किंवा १७:५० ची ठाणे-कर्जत स्लो लोकल पकडावी.

नेरळ स्टेशन प्लेटफोर्म क्र. १ वर कर्जत दिशेने चालत जावे. डाव्या बाजूला निर्माण नगरी प्रवेशद्वारातून उतरुन समोरच असलेली सगुण बागची बस पकडावी. केवळ वरील लोकलने आल्यास हि बस सेवा उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.

 

लोकळच्या वेळा:

मुंबई ते कर्जत (जलद): १६३० (प्रस्थान) : १८०४ (आगमन)

ठाणे-कर्जत (धीमी): १७५० (प्रस्थान) : १८५८ (आगमन)

कर्जतला जाणाऱ्या सर्व लोकल नेरळ येथे थांबतात.

admin

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *