खगोल मंडळाच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या सर्व खगोल मंडळींना हार्दिक शुभेच्छा!

आज खगोल मंडळाच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाली. हॅले धूमकेतूच्या निमित्ताने ही संस्था सुरु झाली. खगोलशास्त्र हे मराठी भाषेतून सर्वांपर्यंत साध्या व सोप्या भाषेतून पोहोचावे यासाठी ही सुरुवात झाली. आज काळाच्या ओघात मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांमध्ये कार्य करते आहे. उत्साहाने लोकांनी प्रतिसाद दिला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. केवळ स्वबळावर मिळवलेल्या निधीवर, कोणतेही फंड न मिळवता केवळ स्वयंसेवकांनी चालवलेली अशी संस्था इतकी वर्षे टिकते हे एक नवलच असते. खगोल मंडळ ही संस्था सन्मानाने उभी आहे. केवळ विज्ञानवादी चर्चा हे ध्येय ठेवून संस्था आजही कार्यरत आहे. निष्ठावान कार्यकर्ते आणि निरपेक्ष हेतूने कार्य यामुळे आज हा दिवस दिसतो आहे. यासाठी खगोल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि खगोल प्रेमींचे अभिनंदन!

खगोल मंडळाच्या ३५ व्या वर्धापनदिना निमित्त संस्थेच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो आहे. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आजही आपण त्याच जोमाने काम करत आहोत. 
करोना पश्चात वैज्ञानिक दृष्टिकोन पूरक काम करणाऱ्या संस्थांवर जास्त ताण येणार आहे. कार्यक्रम कमी, आर्थिक चणचण एका बाजूला व सर्वत्र बोकाळणाऱ्या अवैज्ञानिक चर्चा दुसऱ्या बाजूला अशी विषम परिस्थती असेल. यातुन मार्ग काढत सोप्या भाषेत विज्ञान समजावणे हा कदाचित  एकमेव उपाय असेल. अर्थात मंडळ कार्यकर्त्यांसाठी ही एक पर्वणी ठरेल हे वेगळे सांगायला नको. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आपण नवे प्रयोग करत पुढे जाऊ असे वाटते. 
या प्रसंगी आम्ही मंडळाच्या सर्व कार्यकर्ते, देणगीदार, हितचिंतक तसेच वेळोवेळी मंडळाला मदत करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्तीं प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.  
गेल्या ३५ वर्षां प्रमाणे पुढील काळातही आपण असेच समाजोपयोगी कार्य करत राहू अशी खात्री वाटते.
 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply