सूचना
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कार्यवर्षाकरिता खगोल मंडळाची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वा. ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावामूळे या सभेला केवळ ऑनलाईन हजर होण्याची सुविधा उपलब्ध असून मंडळाच्या सर्व सभासदांनी त्याचा लाभ घेऊन सभेला वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती. गणसंख्येअभावी सभा स्थगित करावी लागल्यास, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी, सायंकाळी ७:०० वाजता ही सभा भरेल व त्या सभेला गणसंख्येचे बंधन राहणार नाही.
सभेपुढील विषय
१) दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.
२) सन २०१९- २०२० या कार्यवर्षाचा अहवाल संमत करणे.
३) सन २०१९- २०२० या कार्यवर्षाचे हिशेब संमत करणे.
४) सन २०२० – २०२१ या कार्यवर्षाकरिता सनदी हिशेब तपासणीस नेमणे व त्यांचे मानधन ठरविणे.
५) अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.
(डॉ. अभय देशपांडे)
सचिव, खगोल मंडळ
मिटींग मध्ये दाखल होण्याची माहिती
झूम मिटिंग आयडी व पास कोड खालील प्रमाणी आहे. त्यात बदल झाल्यास मंडळ संकेत स्थळावरून सदर माहिती मिळू शकेल.
तसेच 902-902-9076 किंवा 98696-10777 या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास माहिती मिळू शकेल यांची कृपया नोंद घ्यावी:
Meeting ID: 864 2538 4745
Passcode: 301220
खालील लिंक वर क्लिक केल्यास झुम सुरू होईल.