
खगोल मंडळ यंदा ३६ व्या वर्षात प्रवेश करत आहे. त्या निमित्त खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे. सर्व व्याख्याने मराठीतून ऑनलाईन घेतली जातील.
अभ्यासवर्ग पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.
दि. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१
दर शनिवारी सायं. ७ ते ८:३० या दरम्यान
प्रवेश शुल्क: रु. ७५०/-
अभ्यासवर्ग ११ वी पासून पुढील सर्वांसाठी योग्य असेल.
महत्वाचे विषय
• खगोलशास्त्राचा इतिहास: ग्रीक, पाश्चात्य तसेच प्राचीन भारतीय खगोलशास्त्र
• सूर्य व सूर्यमालेची निर्मिती
• आपली ग्रहमाला लघुग्रह, धुमकेतू तसेच खुजे ग्रह
• खगोलीय घटना: ग्रह-दर्शनाचे चक्र, सांवासिक काळ
• खगोलीय घटना: ताऱ्यांचे उदय-अस्त, दक्षिणायन-उत्तरायण
• ग्रहणे, पिधान व ग्रहण चक्र
• तारे : स्वरूप
• तारे : जन्म व मृत्यू
• तारे : द्वैती आणि रुपविकारी
• आकाश निरीक्षणाची साधने – शोध, वापर, निवड
• अंतराळातील जीवसृष्टी
• विविध रंगातील विश्व : क्ष, अतिनील तसेच गॅमा प्रारणे
• विश्वाची निर्मिती व आवाका
• निमंत्रित व्याख्यान व प्रशस्तीपत्र वितरण
प्रमुख वक्ते : प्रदीप नायक, डॉ. अनिकेत सुळे, डॉ. सुजाता देशपांडे, महेश नाईक, मिलिंद काळे, डॉ. विनीता नवलकर, प्रीतेश रणदिवे व डॉ. अभय देशपांडे
अधिक माहितीसाठी संपर्क: abhay@khagolmandal.org
त्वरित नोंदणी करा..
अधिक माहितीसाठी संपर्क: abhay@khagolmandal.org
